लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालय येथील ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून त्यांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, डॉ. संभाजी पाटील, ग्रंथपाल प्रा. सूर्यकांत मस्के, डॉ. महेश वावरे, प्रा. सूर्यकांत चव्हाण, डॉ. सचिन कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश रोडिया, प्रा. विजय गवळी, डॉ. शिवराज काचे, डॉ. किशोर शिंदे, प्रा. भैरवनाथ गोरडे, प्रा. नितीन पांचाळ, प्रा. महादेव भाताडे, प्रा. प्रशांत जोशी, प्रा. जिवन गायकवाड, प्रा. सुचित्रा सोनवणे, प्रा. प्रांजली कुंभार, प्रा. स्वाती स्वामी, प्रा. अर्चना सावंत व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘शिवराज्याभिषेक सोहळा हा भारतीय इतिहासातील सर्वात अभिमानास्पद आणि सुवर्णक्षण मानला जातो. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे स्वतंत्र ‘हिंदवी स्वराज्याची’ अधिकृत घोषणा झाली आणि महाराजांनी ‘छत्रपती’ पद धारण केले.
















