महेश देशमुख लातूर, धाराशिव, बीड मतदारसंघात इतिहास रचतील 

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास 
लातूर : प्रतिनिधी 
लातूर, धाराशिव, बीड या विधान परिषदेच्या मतदारसंघात शेतक-यांचे तसेच तरुणांचे प्रतिनिधी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख इतिहास रचतील, असा विश्वास माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. ६ जून रोजी लातूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र देहाडे, धाराशिवचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई भिसे, लातूर मनपातील सभागृह नेते विजयकुमार साबदे, लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल उटगे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, तानाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रात निवडणुकाच होऊ नयेत, अशी सत्ताधा-यांची सध्याची स्थिती आहे, असे नमूद करून माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सत्ताधारी साम, दाम, दंड आणि भेद या सर्वच गोष्टींचा अवलंब करीत आहेत. अशा गलिच्छ वातावरणातही महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ते मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने निवडणुक लढत आहेत. खरे तर सत्ताधा-यांच्या विरोधात निवडणूक लढणे खूप जिकिरीचे झाले आहे. लोकशाही सक्षम करावयाची असेल तर विधान परिषद एक उत्तम माध्यम आहे. महेश देशमुख यांना काँग्रेस महाविकास आघाडीने संधी दिली आहे. ते मतदारसंघातील प्रश्नांवर आग्रही राहून या मतदारसंघाला न्याय मिळवून देतील यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधा-यांकडून प्रचंड प्रमाणात पैशांचा वापर केला जात आहे. पैशांच्या जोरावर निवडणूक  बिनविरोध काढण्याचा सत्ताा-यांचा मनसुबा महेश देशमुख यांनी उधळून लावला. मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. उमेदवार महेश देशमुख म्हणाले, शेतकरी, युवक आणि राजकारण या तीन मुद्यांवर देशाची जडणघडण होत असते. परंतु सध्या सत्ताधा-यांनी शेतक-यांची अवस्था बिकट केली आहे. लाखो युवक बेरोजगार आहेत आणि राजकारण तर गलिच्छ पातळीवर आणले आहे. मतदारांनी मला संधी द्यावी, मतदारसंघातील सर्वच प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे सांगितले. यावेळी राहुल सोनवणे, उमेशराजे निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news