नवी दिल्ली : सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने बँड स्तरावर सेलिब्रिटी एंडोर्समेंटला परवानगी दिली आहे. तसा प्रस्ताव सेबीने दिला आहे. या प्रस्तावानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारे इन्फ्ल्युएन्सरदेखील ‘सेलिबेटी’ म्हणून पात्र ठरणार आहेत.
सेबीने सेलिबेटीची व्याख्या विस्तृत करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये चित्रपट अभिनेता, खेळाडू, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, टेलिव्हिजन अँकर्स, रिऑलिटी शो विजेते आणि अगदी व्हर्चुअल मानवासारख्या अवतारांचाही समावेश असेल. प्रस्तावित कायद्यानुसार एखादी व्यक्ती नमूद केलेल्या आठ निकषांपैकी कोणताही एक निकष पूर्ण केल्यास सेलिबेटी म्हणून पात्र ठरेल. त्यामुळे सेलिबेटी एंडोर्समेंट नियमांतर्गत कोण येते हे ठरवण्यासाठी एक कायदा उपलब्ध होईल. राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कोणत्याही सेलिबेटी यादीच्या अव्वल ५० मध्ये स्थान मिळवतात अशा व्यक्तींचा पहिल्या श्रेणीत समावेश होईल. ही यादी एका वर्षापेक्षा जुनी नसावी.
















