संघाची स्तुती करायची असेल तर आधी राजीनामा द्या

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील भाषणावरून टीका केली आहे. पोलिस अधिका-याने कोणत्याही वैचारिक किंवा सामाजिक संघटनेप्रती सार्वजनिक निष्ठा व्यक्त करणे योग्य नसल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारलाही याबाबत प्रश्न विचारले आहेत.

राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पोलिस अधिका-याची निष्ठा ही केवळ संविधान, कायदा आणि पोलिस दलाच्या कर्तव्याशी असली पाहिजे. मात्र, विश्वास नांगरे पाटील यांनी एका हिंदू संमेलनात उपस्थित राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संस्थापकांविषयी गौरवोद्गार काढल्याने त्यांच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी संबंधित हिंदू संमेलने जरी अराजकीय असल्याचे सांगितले जात असले, तरी ती प्रत्यक्षात राजकीय स्वरूपाची असल्याचा दावा केला. अशा कार्यक्रमात सरकारी सेवेत असलेल्या वरिष्ठ अधिका-यांनी सहभागी होणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे म्हटले की, जर एखाद्या अधिका-याला एखाद्या संघटनेबद्दल वैचारिक जिव्हाळा असेल, तर तो वैयक्तिक पातळीवर ठेवावा. सार्वजनिकपणे अशी भूमिका घ्यायची असेल, तर आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर संबंधित संघटना किंवा राजकीय पक्षात प्रवेश करावा.

राज ठाकरे यांनी सरकारवरही निशाणा साधत, अशा प्रकारच्या कृतीबाबत सरकारची भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला. आज ही भूमिका मान्य केली जात असेल, तर भविष्यात दुस-या कोणत्याही विचारसरणीच्या कार्यक्रमात एखादा अधिकारी सहभागी झाला, तर त्यालाही हेच निकष लागू होतील का? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी २०१२ मधील एका घटनेचाही उल्लेख केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चादरम्यान एका पोलिस कॉन्स्टेबलने पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केल्यामुळे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे उदाहरण देत, त्याच निकषांचा वापर आता केला जाणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षांची संख्या कमी होत असताना सरकारी अधिकारीदेखील जर निष्पक्ष राहिले नाहीत, तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर, असा प्रश्न निर्माण होतो.
शेवटी त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांना उद्देशून, तुम्ही एक सक्षम आणि कार्यक्षम अधिकारी आहात. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेसमोर आपल्या निष्पक्षतेशी तडजोड करू नका, असे आवाहन केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|हळदीला कमी भाव; संतप्त शेतकऱ्यांनी लिलावच बंद पाडला!
05:14
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13

Latest news