मला वाटले होते लोक खामेनींचा द्वेष करतात

वॉशिंग्टन डीसी : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या अन्त्ययात्रेत लाखो नागरिक रस्त्यावर उतरून आक्रोश करत आहेत. हे पाहून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील चकित झाले आहेत. मला वाटले होते की लोक त्यांचा द्वेष करतात, पण कदाचित हे खोटे अश्रूही असू शकतात असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा नवी धमकीही दिली आहे. अन्त्यसंस्कारादरम्यान इराणच्या उर्वरित नेत्यांनाही आपण एका झटक्यात ठार करू शकतो. पण असे केले तर वाटाघाटीसाठी कुणीही शिल्लक राहणार नाही, यामुळे आपण असे करणार नाही. एवढेच नाही तर, इराण करारासाठी याचना करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दुस-याबाजूला, सुरक्षेच्या कारणास्तव अली खामेनी यांचे पुत्र आणि प्रतिनिधी मुज्तबा खामेनी हे आपल्या वडिलांच्या अन्त्यसंस्काराच्या विधींमध्ये सहभागी होणार नाहीत. इस्रायलच्या धमक्या आणि पाळत ठेवण्याच्या शक्यतेमुळे मुज्तबा यांचे जाहीरपणे उपस्थित राहणे धोक्याचे असल्याचे त्यांच्या प्रतिनिधीनी स्पष्ट केले आहे.

४ जुलैचे अमेरिकेशी कनेक्शन
अमेरिकन आणि इस्रायलच्या हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता त्यांच्यावर अन्त्यसंस्कार होत आहेत. महत्वाचे म्हणजे, इराणने ४ जुलैला अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू केली आहे. ४ जुलैला अमेरिकेचा २५० वा वर्धापनदिन होता. ७ जुलै रोजी कोम शहरात धार्मिक कार्यक्रम होतील तर ९ जुलै रोजी मशहद येथे दफनविधी केला जाणार आहे.

एका आठवड्याची मुदत
दोन्ही पक्षांनी या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर वाटाघाटींमधून एक आठवड्याचा विराम घेतला आहे. या काळात कुणीही एकमेकांवर हल्ला करणार नाही, असे ठरले आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणला अन्त्यसंस्कारासाठी एक आठवड्याची मुदत दिली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26
Video thumbnail
निलंग्यात सावकारांचा नंगा नाच! शेतकऱ्यांचे अपहरण करून मारहाण?अर्धं गाव रिकामं... नेमकं काय घडतंय?
09:40
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07

Latest news