श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सरकारी शाळांच्या ग्रंथालयांसाठी खरेदी केलेल्या दोन पुस्तकांवरून यूएपीएअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या पुस्तकांमध्ये मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद आणि फुटीरतावादी नेता मकबूल भट यांना महान व्यक्तिमत्त्वे म्हणून संबोधले आहे. पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स विंगने शनिवारी एफआयआर दाखल करून छापेमारी सुरू केली आहे.
विवादास्पद पुस्तकांपैकी एक हिलाल अहमद आणि संतोष मीना यांचे पर्सनॅलिटीज अँड लीजेंड्स ऑफ जे अॅन्ड के हे आहे. ते जम्मूच्या ओबेरॉय बुक सर्व्हिसने प्रकाशित केले आहे. दुसरे पुस्तक सुशांत गिरी यांचे ‘ग्रेट पर्सनॅलिटी ऑफ जम्मू-काश्मीर’ हे आहे. ते दिल्लीच्या अनुराग प्रकाशनने प्रकाशित केले आहे. अधिका-यांच्या मते, एका पुस्तकाच्या १२३ प्रती जम्मू, रामबन आणि उधमपूर जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या होत्या, तर दुस-या पुस्तकाच्या १२८ प्रती जम्मू आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये वाटण्यात आल्या होत्या. भाजपने याला अकॅडमिक जिहाद संबोधत पुस्तकांवर बंदी घालण्याची आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपने मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याकडे शिक्षणमंत्र्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली.
फुटीरतावाद्यांबद्दल काय?
मकबूल भट (१८ फेब्रुवारी १९३८-११ फेब्रुवारी १९८४) जम्मू-काश्मीरमधील एक फुटीरतावादी नेता आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे सह-संस्थापक होते. दोन खून प्रकरणांमध्ये दोषी ठरवल्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारी १९८४ रोजी नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. मकबूल भट (१८ फेब्रुवारी १९३८-११ फेब्रुवारी १९८४) जम्मू-काश्मीरमधील एक फुटीरतावादी नेता आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे सह-संस्थापक होते. दोन खून प्रकरणांमध्ये दोषी ठरवल्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारी १९८४ रोजी नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
मीरवाइज मुहम्मद उमर फारूक
सैयद अली शाह गिलानी (जन्म: २९ सप्टेंबर १९२९) जम्मू-काश्मीरचे एक फुटीरतावादी नेते होते. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते, परंतु नंतर त्यांनी तहरीक-ए-हुर्रियत नावाचा स्वत:चा पक्ष स्थापन केला. ते फुटीरतावादी पक्षांच्या ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स या संघटनेचे अध्यक्षही होते. याव्यतिरिक्त, ते सोपोर विधानसभा मतदारसंघातून आमदारदेखील होते.
सैय्यद अली शाह गिलानी
जम्मू-काश्मीरचे एक फुटीरतावादी नेते होते. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते, परंतु नंतर त्यांनी तहरीक-ए-हुर्रियत नावाचा स्वत:चा पक्ष स्थापन केला. ते फुटीरतावादी पक्षांच्या ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स या संघटनेचे अध्यक्षही होते. याव्यतिरिक्त, ते सोपोर विधानसभा मतदारसंघातून आमदारदेखील होते.
















