विवाहित मुलीलाही अनुकंपा नोकरीचा अधिकार

नागपूर : कर्मचा-याच्या विवाहित मुलीलाही अनुकंपा नोकरी मिळण्याचा अधिकार आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय वाय. जी. खोब्रागडे व सुशील घोडेस्वार यांनी दिला आहे. विवाहित मुलगी तिच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असते. त्यामुळे केवळ लग्न झाल्याच्या एकमेव तांत्रिक कारणावरून तिला अनुकंपा नोकरी नाकारणे हा उघडपणे लिंगभेद आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील कर्मचारी कवडू वानशिंगे यांच्या मृत्यूनंतर त्यांची विवाहित मुलगी तनुजा झाडे यांनी अनुकंपा नोकरीसाठी वेकोलिला अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रीय कोळसा वेतन करारातील नियमांवर बोट ठेवत वेकोलिने १० एप्रिल २०२५ रोजी तो अर्ज फेटाळला होता. विवाहित मुलीला अनुकंपा नोकरी दिली जाऊ शकत नाही, असे वकोलिचे म्हणणे होते. त्यामुळे तनुजाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका मंजूर करून विवाहित मुलीलाही अनुकंपा नोकरीचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच, वेकोलिचा वादग्रस्त आदेश रद्द करून तनुजाच्या अर्जावर गुणवत्तेच्या आधारे दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश वेकोलिला दिले.

भेदभाव करणे कायदेशीर नाही
लग्नानंतरही मुलगी तिच्या पालकांच्या कुटुंबाशी भावनिक आणि प्रसंगी आर्थिकदृष्ट्या जोडलेली असू शकते. त्यामुळे केवळ वैवाहिक स्थितीच्या आधारावर मुलीमध्ये भेदभाव करणे कायदेशीर चौकटीत बसत नाही. मुलगा विवाहित असला तरी त्याला नोकरी मिळते, मग मुलीलाच केवळ विवाहित असल्यामुळे नोकरी का नाकारायची? हा भेदभाव संविधानाच्या मूळ ढाच्यालाच हरताळ फासणारा आहे, असे महत्त्वपूर्ण मत न्यायालयाने निर्णयात व्यक्त केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13

Latest news