तामिळनाडूत ७ अधिकारी निलंबित

चेन्नई : तामिळनाडू सरकारने भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला आणखी गती देत ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (जीसीसी)च्या सात अधिका-यांना निलंबित केले आहे. या अधिका-यांविरोधात कथित भ्रष्टाचार आणि उत्पन्नाशी विसंगत आर्थिक व्यवहारांच्या आरोपांप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात चेन्नईतील दोन विभागांमध्ये करण्यात आलेल्या अचानक तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली.

ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोन ६ आणि झोन ९ मध्ये ही तपासणी करण्यात आली. उत्तर आणि मध्य चेन्नईतील अनेक महत्त्वाच्या भागांचा या तपासणीत समावेश होता. तपासणीदरम्यान एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला गुगल पे द्वारे झालेल्या २.३९ लाख रुपयांच्या व्यवहारांचे समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

तामिळनाडूच्या दक्षता व भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाने (डीव्हीएसी) सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित अधिका-यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. झोन ६ मध्ये कोलाथूर, अयनावरम आणि पेरंबूर या भागांचा समावेश असून झोन ९ मध्ये थाऊजंड लाईट्स, मायलापूर आणि नुंगमबक्कम या मध्य चेन्नईतील भागांचा समावेश आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लाचखोरी, बनावट बिले आणि नोकरी देण्याच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी केल्याच्या आरोपांप्रकरणी जीसीसीच्या आणखी सहा अधिका-यांना निलंबित करण्यात आले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news