मुंबई : प्रतिनिधी
प्रसिध्द विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी आता जंतरमंतर येथील आंदोलनावर मौन सोडले आहे. जंतरमंतर येथील आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून आता सर्वच स्तरांतून निषेध नोंदवण्यात येत आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलनकर्ते अजूनही ठाम आहेत. त्याकरता कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलक एकत्र जमले आहेत. या आंदोलकांवर झालेल्या क्रूर मारहाणीसंदर्भात आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जॉनी लिव्हर यासंदर्भात म्हणतात की, दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून त्रास होतोय.
याकरता सरकारने किमान विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्या. आंदोलन करणा-या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावे हीच इच्छा आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनामध्ये, अभिनेत्री शबाना आझमी, प्रकाश राज, नसिरूद्दीन शाह अशा विविध मान्यवर सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. जंतरमंतरवर झालेल्या अमानुष लाठीमारानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. गायक दिलजित दोसांज, अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी यांनीही विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला आहे.
















