बचत गटातील महिलांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ

लातूर : प्रतिनिधी
बचत गटातील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाईल. बँकांकडून बचत गटांना गरजेनुसार जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड म्हणाले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) लातूर जिल्हा कार्यालय  अंतर्गत स्थापित एकता लोकसंचालित साधन केंद्र, लातूर (पश्चिम) ची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी भक्ती शक्ती मंगल कार्यालय येथे पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वार्षिक आढावा व नियोजन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महिलांनी कर्जाचा वापर उद्योग-व्यवसायासाठी करून विहित वेळेत परतफेड करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले की, बचत गटातील महिलांची बँक कर्जाची परतफेड ९९.९५ टक्के इतकी असल्याबद्दल त्यांनी महिलांचे कौतुक केले. तसेच लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) महिला विकासासाठी चांगले काम करत असल्याचे सांगत, मशरूम व्यवसाय व रेशीम लागवड यांसारख्या शेतीपूरक व शेतीवर आधारित व्यवसायांकडे महिलांनी वळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात संयुक्त मालकी हक्काबाबत सुमती बिडवे व त्यांच्या टीमने आणि कौटुंबिक हिंसाचाराबाबत बबन हटकर यांनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीएमआरसीच्या अध्यक्षा अश्विनी पडिले होत्या, तर सचिव मंगल भालेराव, जयहिंद सीएमआरसीच्या व्यवस्थापक सविता पाटील, सावित्रीबाई फुले सीएमआरसीच्या व्यवस्थापक उषा डूमने, एचडीएफसीचे भरत काळे आणि कार्यकारिणीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल वाघचौरे व विजयकुमार स्वामी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील श्रीगीरी, अनंत हेरकर, प्रवीण जगताप, सतीश गीते व एकता सीएमआरसीच्या टीमने परिश्रम घेतले. व्यवस्थापक सुजाता तोंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42
Video thumbnail
'प्रति पंढरपूर' वांजरवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त जनसागर; दर्शनासाठी अर्धा किलोमीटरच्या रांगा
03:23
Video thumbnail
"26 दिवस उपोषणानंतरही माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार?" – सोनम वांगचुक यांचा संतप्त सवाल
03:11
Video thumbnail
Amit Deshmukh|सरकारनं चर्चेला उशीर केला; देशाचे सगळे स्तंभ ढासळतायत - आ.अमित देशमुख
04:59
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी आणि लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांचा ‘रॅप सॉंग’ आंदोलन
02:21
Video thumbnail
Latur|क्षयरोगमुक्त गावासाठी मोठी मोहीम; वडवळ नागनाथमध्ये विशेष निक्षय शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या दर्शनासाठी १२०० भाविकांची मोफत वारी; २५ बसने पंढरपूरकडे रवाना!
02:11
Video thumbnail
Latur|लातुरात विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; पाहा आनंदवारीचा जल्लोष!
04:04
Video thumbnail
PM Narendra Modi On NEET Pepar Leak|नीट पेपर फुटी प्रकरणात नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
02:56
Video thumbnail
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पूर्णा बंद; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
06:32
Video thumbnail
Parbhani|लाठीहल्ल्याचा निषेध, परभणी बंद; बाजारपेठेत शुकशुकाट!
02:08

Latest news