प्रियकराच्या मदतीने दारूमधून विष देऊन पतीचा खून ; १५ फूट खोल गाडलेला मृतदेह पाहून पोलिसही चक्रावले

जामनगर : वृत्तसंस्था
गुजरातच्या जामनगरमध्ये दोन वर्षांपूर्वी गायब झालेल्या तरुणाच्या हत्येचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक पर्दाफाश झाला आहे. अनैतिक संबंधांच्या काट्यातून स्वत:च्याच पतीची विष देऊन हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीला दारूत विष मिसळून पाजले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका कारखान्यात १५ फूट खोल खड्ड्यात पुरून टाकला. या भयंकर हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

जिग्नेश मावदीया हा बेपत्ता झाला आहे, अशी तक्रार दोन वर्षांपूर्वी जामनगरच्या सिटी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक आणि गुप्त पद्धतीने तपास सुरू केला. मात्र तब्­बल दोन वर्षे जिग्नेशचा ठावठिकाणा मिळाला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी जिग्नेशच्­या भावाने संशय व्­यक्­त केला आणि अनैतिक संबंधातून पत्­नीने जिग्नेशचा काटा काढण्याचा भयंकर कट रचला असल्­याचे उघडकीस आले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा जिग्नेशच्या घरी मद्य प्राशन करण्यासाठी आला. यावेळी पृथ्वीच्या मदतीने त्याने जिग्नेशच्या दारूत सायनाईड मिसळले. मद्य प्राशन करताच जिग्नेशचा जागीच मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी मृत जिग्नेशचा भाऊ अशोक मावदीया याने जिग्नेशबरोबर फोनवर बोलायचे आहे, असे पत्नी पृथ्वीला सांगितले. मात्र ती टाळाटाळ करू लागली. अशोकने थेट पोलिसांत जाण्याचा इशारा दिला. या धमकीमुळे आरोपी पत्नी घाबरली आणि तिच्या चेह-यावरील भीती पाहून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी दाखवलेल्या जामनगरमधील दरेड येथील कारखान्यात पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत उत्खनन सुरू केले. १५ फूट खोल खड्ड्यातून मानवी सांगाडा आणि अवशेष बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पृथ्वी आणि तिचा प्रियकर निलेश कचेटिया या दोघांविरुद्ध हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मानवी अवशेषांची डीएनए आणि वैज्ञानिक तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

१५ फूट खड्डा खोदून मृतदेह पुरला
जिग्नेशचा खून केल्यानंतर हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी, आरोपींनी मृतदेह दरेड परिसरातील एका भाड्याने घेतलेल्या कारखान्यात नेला. तेथे १२ ते १५ फूट खोल खड्डा खोदून मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

पती ऑस्ट्रेलियात गेला असल्याचा पत्नीचा बनाव
पतीची निर्घृण हत्या केल्यानंतर पत्नी पृथ्वीने कुटुंबाला तब्बल दोन वर्षे अंधारात ठेवले. जिग्नेश ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी गेला आहे आणि तो ज्या कंपनीत काम करतो तिथे मोबाईल वापरण्यास बंदी आहे, अशी खोटी माहिती देऊन ती नातेवाईकांची दिशाभूल करत राहिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01
Video thumbnail
Latur|हैदराबाद-विजयवाडा अभ्यास दौऱ्यावर 27 नगरसेवक; बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोठी तयारी!
03:22
Video thumbnail
जळकोटजवळ अपघाताचा दृश्य , कारच्या अवस्था पाहून चिंता व्हाल #accident #maharashtra
00:23
Video thumbnail
Nanded|हळदीला कमी भाव; संतप्त शेतकऱ्यांनी लिलावच बंद पाडला!
05:14
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50

Latest news