टिळकांचे कार्य आजही प्रत्येकाला देशप्रेम, स्वाभिमान, राष्ट्रसेवेची शिकवण देते : शेख

लातूर : प्रतिनिधी
भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची जाणीव जागवण्याचे महान कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. लोकांना अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची प्रेरणा त्यांनी दिली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना टिळकांनी केली. म्हणून त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाला देशप्रेम, स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रसेवा हीच त्यांची खरी शिकवण आसल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक मैनोदीन शेख यांनी केले.

भोईसमुद्रा येथील कै. पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक शेख या दोन्ही महापुरुषांच्या अभिवादन प्रसंगी बोलत होते. यावेळी रविकिरण चामे, बालाजी येलाले, संतोष दळवे, शरद पवार, सुमित्रा साबळे, गणपती मुंडे, भागवत करपुडे, विष्णू घुले, ज्ञानोबा बोयणे, तानाजी सुरवसे उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही केवळ कादंबरी नसून अन्याय, गुलामी आणि शोषणाविरुद्ध उभ्या राहिलेल्या सामान्य माणसाच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. फकीरा हा धाडसी, स्वाभिमानी आणि न्यायप्रिय व्यक्तिमत्व आहे. तो स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर समाजातील गरीब शोषित आणि वंचित लोकांच्या हक्कासाठी संघर्ष करतो. जातीभेद, सामाजिक विषमता, दारिर्द्य आणि ब्रिटिश सत्तेच्या काळातील अन्याय याचे वास्तववादी या कादंबरीतून विवेचन केले आसल्याचे सांगून शेख म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमानाने जगण्याची आणि समाजातील दुर्बल घटकाप्रती संवेदनशील राहण्याची प्रेरणा देते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news