जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करणार

मुंबई : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला एक मोठे आणि महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. आगामी जातीय जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ ऑगस्ट रोजी हे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधी, विचारवंत आणि ओबीसी समाजाचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या व्हीडीओ संदेशातून ओबीसी महासंघाला शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले. आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याच्या मागणीला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून जनगणनेत या कॉलमचा समावेश केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी जे काही ठराव संमत केले जातील, ते राज्य सरकार नक्कीच अमलात आणेल, असा महत्त्वपूर्ण शब्द त्यांनी समाजाला दिला.

महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत फडणवीस म्हणाले, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. महात्मा फुले यांनी शोषित आणि वंचित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. आज आपला भारत देश सामाजिक समरसतेवर उभा आहे. एखाद्या व्यक्तीचे मूल्य त्याच्या जातीवरून नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरून, प्रतिभेवरून आणि परिश्रमावरून ठरले पाहिजे.

अधिवेशनातील प्रमुख मागण्या आणि ठराव
ओबीसींची जातनिहाय जनगणना
२०२७ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी आणि जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी वेगळा कॉलम ठेवण्यात यावा.
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणे
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवून, ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार हक्काचे आरक्षण देण्यात यावे.

केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय
ओबीसी समाजाच्या विकासासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केंद्र स्तरावर एका स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी.
राजकीय आरक्षण पूर्ववत करणे
सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च २०२१ च्या आदेशानुसार रद्द झालेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (उदा. ग्रामपंचायत, नगरपालिका) ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे. यासाठी संविधानाच्या कलम २४३ डी (६) आणि कलम २४३ टी (६) मध्ये तातडीने दुरुस्ती करून देशातील ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात २७ टक्के राजकीय आरक्षण द्यावे.

क्रीमिलेअरच्या अटीत बदल
१३ सप्टेंबर २०१७ पासून ओबीसींसाठी असलेली क्रीमिलेअरची मर्यादा वाढवण्यात आलेली नाही. ही अट त्वरित रद्द करावी आणि जोपर्यंत ती रद्द होत नाही, तोपर्यंत ही उत्पन्नाची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवावी.

अर्थसंकल्पात भरीव तरतूद
ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी.
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार
बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.

शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन
ओबीसी प्रवर्गातील जे शेतकरी आणि शेतमजूर आहेत, त्यांच्यासाठी वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनातर्फे पेन्शन योजना सुरू करण्यात यावी.

आयोजकांचे आणि पदाधिका-यांचे आवाहन
या भव्य राष्ट्रीय अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर व इतर पदाधिका-यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी देशभरातील ओबीसी बांधवांना एकत्र येऊन या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अधिवेशनामुळे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या असून, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठरावांवर आता काय प्रत्यक्ष कार्यवाही करते, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागून आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news