रशिया-युक्रेन युध्दाशी संबंधीत कायदेशीर लढा माजी सरन्यायाधीश चंद्रचूड लढणार

मॉस्को : गेल्या जवळपास चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. युक्रेन-रशिया हे दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. या युद्धाचा परिणाम फक्त या दोन्ही देशांवरच होत नसून याचा जगाला फटका बसत आहे. रशिया-युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेनेही प्रयत्न केले. मात्र, तरीही या युद्धाबाबत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. या घडामोडी दरम्यान आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

युक्रेन युद्धाशी संबंधित एका आंतरराष्ट्रीय प्रकरणाच्या कायदेशीर लढ्याची धुरा रशियाने भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर सोपवली असल्याची माहिती समोर आली आहे. आता आंतरराष्ट्रीय लवादात धनंजय चंद्रचूड हे रशियाची बाजू मांडणार आहेत. हे प्रकरण युक्रेनच्या ओशचाडबँक या सरकारी बँकेच्या संदर्भातील असल्याची माहिती सांगितली जाते. भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर रशियाने विश्वास दाखवत एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. युक्रेनच्या ओशचाडबँक या सरकारी बँकेच्या संदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर धनंजय चंद्रचूड हे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. या संदर्भातील वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, युक्रेनच्या ओशचाडबँक या सरकारी बँकेने रशियाच्या विरोधात एक याचिका आंतरराष्ट्रीय लवादात दाखल केली आहे. हे आंतरराष्ट्रीय लवाद या प्रकरणावर आता सुनावणी घेत आहे. हे संपूर्ण प्रकरण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणि लष्करी कारवायांमुळे बँकेच्या कामकाजावर झालेला कथित परिणाम आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संबंधित आहे.

हे प्रकरण युक्रेनमधील डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया या प्रदेशांमधील ओशचाडबँकेची मालमत्ता आणि व्यावसायिक कामकाज यांच्याशी संबंधित बँकेच्या दाव्याशी निगडित आहे. २०२२ मध्ये रशियाने केलेल्या मोठ्या प्रमाणावरील आक्रमणामुळे आणि त्यानंतर युक्रेनमध्ये झालेल्या लष्करी कारवाईमुळे कथितपणे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. दरम्यान, ग्लोबल आर्बिट्रेशन रिव् ूच्या एका अहवालानुसार, डी.वाय.चंद्रचूड हे युक्रेनच्या सरकारी मालकीच्या ओशचाडबँकने दाखल केलेल्या वादावर सुनावणी करणा-या आंतरराष्ट्रीय लवादात रशियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40

Latest news