शेजारी देश भारताला घेरण्याच्या तयारीत?

नवी दिल्ली : तुर्कीचे वर्तमानपत्र येनी शफाकने एक वृत्त छापून पाकिस्तान आणि तुर्की बांगलादेशलाही आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चेला चांगलीच हवा दिली. या वर्तमानपत्राने एका लेखात जर बांगलादेश हा सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्या सुरक्षा सहकार्य करारात सामील झाला तर याचा दक्षिण आशियाच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचे भाकीत नोंदवले आहे. या लेखात बांगलादेशला या फ्रेमवर्कमध्ये सामील करण्याबाबत अजून अधिकृत निर्णय झालेला नाही.

येनी शफाफच्या म्हणण्यानुसार जर ढाका या संरक्षण करारात सामील होते तर त्याच्या परराष्ट्र धोरणात बदल होत आहे हा एक मोठा संकेत असेल. या वर्तमानपत्राच्या म्हणण्यानुसार बांगलादेश बांगलादेश भारतावरील आपली पारंपरिक अवलंबत्व कमी करत चीन, भारत आणि पश्चिमी देशांसोबतच्या रिलेशनशिवाय नवा पर्याय चाचपू शकतो. वृत्तात हे कोणत्या एका देशाच्या विरूद्ध थेट पाऊल नाही. मात्र आपली रणनैतिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असे दाखवण्यात आले आहे.

तुर्की, पाकचा बांगलादेशमध्ये रस
या लेखानुसार पाकिस्तान आणि तुर्की बांगलादेशसोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यामध्ये रस ठेवतो. विशेष करून तुर्कीचे ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान बांगलादेशसाठी आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरू शकतो. बांगलादेश आणि तुर्की यांच्यात पहिल्यापासून संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक पावले देखील उचलण्यात आली आहेत.

भारतासाठी डोकेदुखी?
या लेखातील विश्लेषणात भारताबाबत विशेष उल्लेख करण्यात आला आहे. जर बांगलादेश इस्लामिक नाटोच्या जवळ जातो तर भारताकडे बांगलादेशसोबतच्या आपल्या नात्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोणातून पहावे लागेल. भारत आणि बांगलादेश हे जवळपास ४ हजार ९६ किलोमीटरची सीमा शेअरÞ करतात. व्यापार, नद्यांचे पाणीवाटप बंगालच्या खाडीबाबतचे निर्णय याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या वृत्तपत्रानुसार तुर्कीचे संरक्षण तंत्रज्ञान, पाकिस्तानचा लष्करी अनुभव बांगलादेशची सैन्य क्षमता वाढवण्यास मदत करू शकते. त्यानंतर भारताला आपल्या पूर्व समुद्री भागावर रणनैतिक समिकरणांवर करडी नजर ठेवावी लागणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news