लातूर शहरात आज रानभाजी महोत्सव 

लातूर : रानभाज्यांचे मानवी आरोग्यातील महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा प्रसार करणे तसेच त्यांच्या विक्रीसाठी एक सक्षम विपणन साखळी निर्माण करणे या मुख्य उद्देशाने कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या वर्षाकरिता विशेष रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा रानभाजी महोत्सव आज दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत लातूर शहरातील औसा रोडवरील दत्त मंदिराशेजारील कल्पतरु मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महोत्सवामध्ये दुर्मीळ रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्ट्ये, त्यांचे औषधी गुणधर्म, आरोग्यासाठी होणारे उपयोग, रानभाज्यांच्या संवर्धन पद्धती आणि पारंपरिक पाककृती (रेसिपी) यांची सचित्र व तांत्रिक माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
तसेच या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या व रानफळे थेट खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. लातूर जिल्ह्यातील ज्या शेतक-यांकडे रानभाज्या व रानफळे उपलब्ध आहेत, त्यांनी ही उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी सोबत आणावीत; कृषी विभागामार्फत त्यांना विक्री व्यवस्थापनाची योग्य सोय उपलब्ध करून दिली जाईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक बंधू-भगिनींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रानभाज्यांची माहिती जाणून घ्यावी व रानभाज्यांची खरेदी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 01.09.26
20:42
Video thumbnail
Latur|एसटीचा प्रवास करण्यापूर्वी हे तपासा; अन्यथा भरावे लागेल पूर्ण तिकीट!
03:44
Video thumbnail
Latur|हेल्मेट मोहिमेसाठी वरिष्ठ अधिकारी मैदानात; महामार्गावर कडक तपासणी
02:48
Video thumbnail
Nanded Accident|नांदेडमध्ये भरधाव पिकअपने स्कुटीस्वार तरुणीला दिली धडक; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू
01:00
Video thumbnail
Nanded Congress Protest|राहुल गांधींवर ॲट्रॉसिटी गुन्हा; नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन
03:06
Video thumbnail
Latur|स्वस्त हेल्मेटच्या नादात जीव धोक्यात! लातुरात डुप्लिकेट हेल्मेटचा पर्दाफाश
03:57
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘नो हेल्मेट, नो एक्सक्यूज’! आजपासून थेट कारवाई
05:43
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
01:48:18
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16

Latest news