न-हे-आंबेगावात मध्यरात्री भीषण अपघात; २ ठार, १२ जखमी

धायरी : प्रतिनिधी
मुंबई- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील न-हे- आंबेगाव परिसरातील जांभूळवाडीमधील दरी पुलाजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्­यू झाला असून, बारा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हृदयनाथ मोहन गायकवाड (वय ४७, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५०, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांचा मृत्यू झाला. तर, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी (दि. १३) रात्री साडेबारा वाजण्याच्­या सुमारास लक्ष्मी लॉजसमोर घडली.

घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, उपायुक्त संदीप भाजीभाकरे, आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्­यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड व पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा बाजूकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने पुढे चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने ही वाहने मुंबईला जाणारी लेन सोडून रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजक तोडून सातारा बाजूकडे जाणा-या विरुद्ध लेनवर आली. दरम्यान, त्याच वेळी मुंबई बाजूकडून सातारा बाजूकडे जाणा-या दोन मोटारींना या वाहनांनी जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला.

हृदयनाथ गायकवाड (वय ४७, रा. मुंबई) आणि आनंदीबाई वाडकर (वय ५०, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर भारती, मोरया, सिल्व्हर बर्च आणि श्रेयस रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक प्रमोद विठ्ठल वाघ (वय ४०) आणि ट्रकमालक संदीप गोरख सूर्यवंशी (वय ४५, दोघे रा. खटाव, जि. सातारा) यांच्याविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकमालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महामार्ग प्रशासनाचे अधिकारी आलेच नाहीत
राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊनही महामार्ग प्रशासनाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. तसेच, त्यांची अपघातग्रस्त अवजड वाहने बाजूला घेण्यासाठी क्रेनसुद्धा लवकर घटनास्थळी पोहोचली नाही. पोलिस अधिका-यांनी वारंवार फोन करून सुद्धा त्यांना क्रेनसाठी बराच वेळ ताटकळत बसावे लागले. अखेर अडीच तास होऊन गेल्यानंतर त्यांची क्रेन घटनास्थळी आली. त्यामुळे नागरिक, वाहनचालक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
00:00
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58

Latest news