महापालिका अधिकारी दलाल बनलेत; भायखळा भूखंड प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांची टीका

मुंबई : प्रतिनिधी
भायखळा येथील महापालिकेच्या जुन्या कर्मचारी वसाहतीची (बीएमसी स्टाफ क्वार्टर्स) तब्बल ८०,००० चौरस फूट मोक्याची जागा कोणत्याही प्रकारची निविदा न काढता एका खासगी विकासकाच्या घशात घातल्याचा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

भायखळा परिसरातील जुन्या बीएमसी कर्मचा-यांच्या वसाहतीची सुमारे ८०,००० चौरस फूट जागा ‘वाय एम अर्बन डेव्हलपर’ नावाच्या विकसकाला विकासासाठी देण्यात आली आहे. ही जागा ‘रसूलजी जीवा कंपाऊंड’ (दयाळजी जीवा कंपाऊंड) या नावाने ओळखली जाते. या पुनर्विकासासाठी महापालिकेच्या वसाहतीमधील मूळ कर्मचा-यांना आधीच तिथून हलवण्यात आले आहे. कोणतीही खुली निविदा न काढता किंवा पारदर्शक प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची ही जागा थेट बिल्डरला कोणत्या नियमांच्या आधारे देण्यात आली, यामागे नेमका कोणाचा मोठा राजकीय वरदहस्त आहे, असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

या जागेच्या समोर असलेल्या दयाळजी वेलजी चाळीतील दुकानदारांना महापालिका अधिकारी लक्ष्य करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. दयाळजी वेलजी चाळीत सुमारे ६ मराठी दुकानदार गेल्या ५०वर्षांपासून अधिकृतपणे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. विकासकाच्या जागेला मुख्य रस्त्याकडून थेट प्रवेश मिळावा आणि त्याच्या भूखंडाची बाजारभावातील किंमत कोट्यवधी रुपयांनी वाढावी, यासाठी महापालिकेच्या भ्रष्ट अधिका-यांनी हे कारस्थान रचले आहे. या दुकानदारांचा बिल्डरच्या जागेशी किंवा पुनर्विकासाशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नसताना, स्वत:चे हात ओले करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी या गरीब दुकानदारांना बेकायदेशीरपणे हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईची लूट सहन करणार नाही
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. बीएमसी स्टाफ क्वार्टरची ८० हजार स्क्वेअर फूट जागा कुठलेही टेंडर न काढता ‘वाय एम अर्बन डेव्हलपर’ या बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ज्या दुकानदारांचा बिल्डरच्या जागेशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, त्यांना मुख्य रस्ता मिळवून देण्यासाठी महापालिकेचे अधिकारी बिल्डरचे दलाल बनून धमकावत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना आम्ही पत्र दिले आहे. मुंबईची ही लूट आम्ही अजिबात सहन करणार नाही!

मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला असून लेखी पत्रही सादर केले आहे. ‘‘मुंबईची हक्काची जागा अशा प्रकारे बिल्डरांच्या घशात घालणे आणि मूळ स्थानिक मराठी माणसाला उद्ध्वस्त करणे खपवून घेतले जाणार नाही.’’ कोणत्याही परिस्थितीत दयाळजी वेलजी चाळीमधील त्या ६ मराठी दुकानदारांवर अन्यायकारक किंवा बेकायदेशीर कारवाई होऊ दिली जाणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|आधी कचरा टाकला... मग त्याच कचऱ्याची केली स्वच्छता! नांदेड महापालिकेचा कारभार चर्चेत
01:23
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
11:55
Video thumbnail
Babasaheb Patil|खरीप पिकांच्या नुकसानीवर सरकारचा प्लॅन काय? सहकारमंत्र्यांनी दिलं उत्तर
01:37
Video thumbnail
Latur|जळकोटच्या स्वातंत्र्यसैनिकांचा निजामाविरोधातील लढा आजही इतिहासात जिवंत
02:50
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातून पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार
04:05
Video thumbnail
Latur|डॉ. विजयकुमार यादव यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील श्रीगणेशाची आरती
01:39
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; हुतात्म्यांना मानाचा मुजरा
00:50
Video thumbnail
Renapur|हातभट्टीच्या अड्ड्यांवर रेणापूर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
01:46
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29

Latest news