कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रयत्न;कर्जमाफी, पीकविमा आणि शेतक-यांच्या प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी

नांदेड : प्रतिनिधी
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आजपासून दुष्काळी दौ-यावर असून, या दौ-यादरम्यान ते नांदेड जिल्ह्यातील शेतपिकांची पाहणी तसेच विभागीय अधिका-यांसोबत बैठक घेणार आहेत. मात्र, कृषिमंत्री विभागीय बैठकीसाठी रवाना होत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.
कृषिमंत्र्यांची गाडी येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनासमोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी कर्जमाफी झाली पाहिजे, शेतक-यांना पीकविमा मिळाला पाहिजे, अशा विविध घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कृषिमंत्र्यांना वाळलेले सोयाबीन दाखवून शेतक-यांच्या नुकसानीची माहिती देण्याचा तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शेतक-यांना कर्जमाफी, पीकविम्याची रक्कम आणि दुष्काळी परिस्थितीत योग्य मदत मिळावी, अशी मागणी केली.

दरम्यान, कृषिमंत्री दत्ता भरणे हे पुयनी आणि मरळक येथे पिकांची पाहणी करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते. या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मात्र, कृषिमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भाग्यनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शेतक-यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कृषिमंत्र्यांच्या दौ-यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काँग्रेस कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे आपल्या नियोजित विभागीय बैठकीसाठी रवाना झाले. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान, कर्जमाफी आणि पीकविम्याचा प्रश्न यावरून आगामी काळात शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35
Video thumbnail
Latur|राजा मणियार यांच्या आरोपांना मस्के बंधूंचा पलटवार; पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर
08:28
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूरकरांनो लक्ष द्या!बस स्टँड ते शाहू कॉलेज मार्ग बंद; वन वेची अंमलबजावणी सुरू
03:02
Video thumbnail
Latur|लातूर काँग्रेसची नवी कार्यकारणी मैदानात; दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
04:08

Latest news