‘लालपरी’ च्या ताफ्यात येणार २०० अत्याधुनिक व्होल्वो बस; खासगी आराम बससेवेला देणार टक्कर

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणा-या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यात १७० आसनी आणि ३० शयनयान बसेसचा समावेश असणार आहे. सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळणार असून आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि एसटीवरील विश्वास यांच्या बळावर लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत ‘लालपरी’ आता नव्या दमाने, नव्या रूपात आणि नव्या अनुभवासह सज्ज होत आहे.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्हल्वो बसेस समाविष्ट होत आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे.

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा
२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

खासगी अ‍ॅपवरही आरक्षणाची सुविधा
नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.

खासगी संस्थेकडून आतिथ्य व्यवस्थापन
प्रवाशांना केवळ आरामदायी बसच नव्हे, तर हाय-एंड प्रवासी सेवांचा अनुभव मिळावा, यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासी सेवेबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि ग्राहकसेवेच्या आधुनिक संकल्पनेचा समावेश होणार असून, प्रवाशांना अधिक सुखकर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास
महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35

Latest news