दिवाळीत फटाकेबंदी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिवाळीत फटाके फोडण्याच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान दिवाळीत फटाके फोडण्यास पूर्णत: बंदी घालता येणार नाही. परंतु दिवसभरात फटाके फोडण्याची परवानगी देता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने दिवाळीत फटाक्यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याच्या बाजूने नसल्याचे म्हटले. कारण त्यामुळे दिवाळी साजरी करणा-या लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. किंबहुना न्यायालयाने दिवसभर फटाके फोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट केले.

आम्ही पूर्ण बंदीच्या मताशी सहमत नाही आणि आम्ही २४ तास फटाके फोडण्याची परवानगीही देणार नाही. पूर्ण बंदीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील आणि दिवसभर फटाके फोडण्याची परवानगी दिल्यास वृद्ध, आजारी आणि लहान मुलांसह इतर नागरिकांवर मोठा परिणाम होईल. आपल्याला असा उपाय शोधण्याची गरज आहे ज्याद्वारे आपण फटाके फोडण्यासाठी विशिष्ट वेळ निश्चित करू शकू, असे न्यायालयाने म्हटले.

यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटाक्यांवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. न्यायालय २०१५ मधील एका खटल्यावर सुनावणी करत होते. या खटल्यांतर्गत न्यायालय दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये जिथे ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान वायू प्रदूषणाची समस्या असते, अशा ठिकाणी फटाक्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश देत आले आहे.

दरम्यान, दिल्लीतील खराब हवेच्या गुणवत्तेच्या सततच्या समस्येमुळे, न्यायालयाने यापूर्वी दिल्लीत फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली होती. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिवाळी सणादरम्यान मर्यादित कालावधीसाठी ग्रीन फटाके (पर्यावरणपूरक फटाके) विक्री आणि फोडण्यास परवानगी दिली होती. या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीपीसीबीकडून यावर प्रतिक्रिया मागितली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42
Video thumbnail
Dharashiv|हातातोंडाशी आलेला घासही जळाला; तेरमध्ये शेतकऱ्यावर दुहेरी संकट
02:39
Video thumbnail
Dharashiv|डोळ्यांसमोर पीक करपलं; अखेर शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटावेटर!
03:46
Video thumbnail
Ashok Chavan Audio Clip Viral|दोन दिवस शांत राहा, शिव्या खा!” अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओने खळबळ
00:58
Video thumbnail
वडगाव हातकणंगले महामार्गावरील भीषण अपघात CCTV कॅमेरात कैद. #marathinews #breakingnews
00:25
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळाचा आणखी एक बळी? अहमदपूरमध्ये ६० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
02:32

Latest news