सरसकटचे आश्वासन देऊन कसले पंचनामे करताय?

लातूर : एजाज शेख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण स्वत: दि. २३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर आला होता. करपलेल्या पिकांची पाहणी केली. सन १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ असल्याचे तुम्हीच सांगीतलात. एवढेच नव्हे तर दुष्काळाने उद्धवस्त केलेले शेतक-यांचे दुख पाहूण तुमचे  अश्रुही अनावर झाले. तुम्हीच म्हणालात की, पंचनाम्यासारखं काही उरलच नाही. शेतक-यांचे सरसकट नुकसान झाले आहे. परंतु, तांत्रिकबाब म्हणून पंचनामे करणे आवश्यक आहे. असे असले तरी सरसकट मदत देऊ . मात्र आज तुम्हीच शब्द फिरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतक-यांना पंचनाम्याच्या किचकट प्रक्रियेला समोरे जावे लागत आहे. पंचनाम्यासाठी आवश्यक विविध कागदपत्रांसाठी शेतक-यांची दमछाक होत आहे. तुम्हीच सरसकट मदतीचे आश्वासन दिले, मग कसले पंचनामे करताय?, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
राज्यभरात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके डोळ्यादेखत वाळून गेली आहेतच; आता प्रशासकीय पंचनाम्यांची संथ गती, अशा संकटात महाराष्ट्राचा बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थितीशी सामना करत लातूर जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतक-यांच्या आत्महत्या काळजाचा ठोका चुकवणा-या ठरत आहेत.   दुष्काळाच्या या तीव्र झळांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात महसूल व कृषी विभागाने बाधित शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पंचनामे सुरू केल्या आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु असली तरी  दुष्काळाच्या झळांनी शेतकरी अक्षरश: होरपळत असताना पंचनामे, अहवाल आणि प्रशासकीय वेळकाढूपणाच्या कचाट्यात मदत अडकली आहे.
पावसाने ओड दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी विभागाने लातूर जिल्ह्यात पीक नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू केले आहेत. शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता सोयाबीनच्या पोकळ शेंगा, खुंटलेली तूर आणि करपलेली पिके असे विदारक चित्र दिसून आले. पंचनाम्याच्या अटी खूप किचकट असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना किचकट कागदपत्रांमध्ये न अकडवता, शासनाने संवेदनशीलता दाखवून कोणतेही जाचक निकष न लावता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
तलाठ्यांचे मनुष्यबळ तुटपुंजे; लाखो शेतक-यांपर्यंत पोहोचणार कसे?
लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शेतक-यांच्या पिकांचे आठवडाभरात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ९४२ गावांतील ५.२० लाख खातेदारांचे पंचनामे करावयाची आहेत. या लाखो खातेदारांच्या तूलनेत तलाठ्यांचे मनुष्यबळ अत्यंत तुटपुंजे असल्याने प्रत्येक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
मदतीसाठी शेतक-यांना प्रतीक्षा करावीच लागणार 
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील एकुण नुकसान आणि त्याची टक्केवारी निश्चित करुन अंतिम अहवाल राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करणार आहे. अहवालाच्या आधारे राज्य शासन हेक्टरी किती रुपयांची मदत मंजूर करायची, याचा अंतिम निर्णय घेणार आहे. त्यानंतर निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होताच डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03
Video thumbnail
१४ तलाव आरक्षित, तरीही वीजचोरी अन् पाणी उपसा; जळकोटमध्ये तहसील पथकाची धडक कारवाई!
04:11
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43

Latest news