सरकार धूर्त; पीक कापणी प्रयोग करून घ्या

लातूर : एजाज शेख
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीत पीक विमा आणि सरकारी मदत मिळवण्यासाठी ‘पीक कापणी प्रयोग’ हा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. शासनाच्या सुधारित पीक विमा योजनेनुसार, शेतक-यांना मिळणारी नुकसानभरपाई आता प्रामुख्याने प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून येणा-या उत्पादनाच्या आकडेवारीवरच अवलंबून असते, हे शेतक-यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगावरच सर्व खेळ चालणार आहे. असे असताना सरकारी यंत्रणा संथ गतीने पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया राबवत आहे. तर दुसरीकडे पाऊस नसल्याने पिके शेतातच वाळून जात आहेत आणि शेतकरी मुदतीपूर्वीच शेत रिकामे करत आहेत. एकदा का शेत रिकामे झाले की, पीक कापणी प्रयोगाचा आणि पीक विम्याचा विषयच राहात नाही. हा सरकारी धूर्तपणा शेतक-यांनी ओळखला पाहिजे आणि पीक कापणी प्रयोगाच्या प्रक्रियेत स्वत: सहभागी होऊन ही प्रक्रिया जलद गतीने पुर्ण केली पाहिजे.
लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ९४२ गावांतील दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी उभी पिके करपली आहेत. पीक विम्यासाठी आवश्यक बाब म्हणून सरकारने पीक कापणी प्रयोग सुरु आहेत. ‘तिमाई’ या प्रणालीद्वारे संगणकीय पद्धतीने २० टक्के गावे या प्रयोगासाठी अचानक निवडली जातात.
निवडलेल्या शेतात सर्वसाधारणपणे ५ मीटर बाय ५ मीटर (५.५) किंवा पिकाच्या प्रकारानुसार ठराविक आकाराचा ‘प्रायोगिक भूखंड’ टाकला जातो. त्या विशिष्ट ५.५ मीटर क्षेत्रातील पिकाची कापणी केली जाते. गोळा झालेले धान्य किंवा उत्पादन मोजले जाते, सुकवले जाते आणि त्याचे अचूक वजन केले जाते. प्रयोगाची पारदर्शकता टिकवण्यासाठी अधिकारी ‘सीसीई मोबाईल अ‍ॅप’ च्या माध्यमातून थेट शेतातून पिकाचे फोटो, जीपीएस लोकेशन आणि वजनाची अचूक नोंदणी शासनाकडे करतात.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03
Video thumbnail
१४ तलाव आरक्षित, तरीही वीजचोरी अन् पाणी उपसा; जळकोटमध्ये तहसील पथकाची धडक कारवाई!
04:11
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43

Latest news