अहमदपूर: रविकांत क्षेत्रपाळे
शहरासह ग्रामीण भागातील शेतक-यांना सोबत घेऊन शेतीमध्ये जाऊन ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व ग्राम विकास अधिकारी आदीजन शेतक-यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन अर्धा गुंठा जमिनीत पीक कापणी प्रयोग करीत आहेत. १०..०५ मीटरमध्ये या तालुक्यात फक्त एक किलो ५० ते १०० ग्राम इतके सोयाबीन पीकाचे उत्पन्न निघत असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील शहरासह ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीती मध्ये पीक विमा आणि सरकारी मदत मिळवण्यासाठी ‘पीक कापणी प्रयोग’ हा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. यामुळे वरील तीन अधिकारी शेतक-यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतक-यांनी ज्या पिकावर पीक विमा भरला आहे. या पद्धतीने शेतकरी अधिका-यांना प्रामाणिकपणे सांगत आहेत. जे पीक शेतकरी सांगत आहेत. तेच पीक शेतक-यांनी खरेच आपल्या शेतात पेरले आहे काय याची खातरजमा करण्याचे ही काम अधिकारी मंडळी करत आहेत. शासनाच्या सुधारित पीक विमा योजनेनुसार, शेतक-यांना मिळणारी नुकसानभरपाई आता प्रामुख्याने प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून येणा-या उत्पादनाच्या आकडेवारीवरच मिळण्याचे अवलंबून असते. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये अधिकारी प्रत्यक्ष शेतीवर जाऊन पीक कापणी प्रयोग करून सरासरी अनिवारीमध्ये उत्पन्न किती निघत आहे याची शहानिशा करीत आहेत. शेतक-यांना प्रत्यक्ष शेतीवर बोलावून घेऊन त्यांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य: आहे.
















