मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना राज्य सरकारने दिवाळी भेट दिली असून, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त १० हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. एसटी कर्मचा-यांच्या संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंर्त्यांनी ही घोषणा केली आहे.

एसटी कर्मचा-यांची संघटना आणि परिवहनमंर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचा-यांना दिवाळी निमित्त १० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच कर्मचा-यांना २२ हजार रुपयांची उचल घेता येणार आहे. उचल केलेले पैसे नंतर पगारामधून वळते केले जातील. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटीच्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे.
आजच त्यांचं तोंड गोड केलं आहे. त्यामुळे ते प्रवाशांना अधिक वेठीस धरण्याचा प्रयत्न ते करणार नाहीत, असं मला वाटतं. तसेच पुकारलेला संप ते मागे घेतील. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत दिवाळीनंतर आम्ही बैठक घेऊ, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, एसटीच्या सर्व कामगार प्रतिनिधींना माझं हेच सांगणं आहे की, एसटी महामंडळ तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं देतंय. माझ्या माध्यमातून, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि गरज पडली तर मुख्यमंर्त्यांनाही आम्ही निर्णय घ्यायला सांगतो. असं असताना संपासारखं हत्यात कुठेही उपसू नये, अशी विनंती मी त्यांना वारंवार करत आलो आहे. आजही त्यांनी ज्या मागण्या केल्या, त्याला फार वेळ न घेता, सर्व अधिका-यांशी चर्चा करून एसटी महामंडळाची परिस्थिती नसतानाही आम्ही हा निर्णय घेतला आहे. याचा विचार करून त्यांनीही संपासारख्या हत्याराचा वापर करणं योग्य नाही, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.