दुुष्काळाची व्याप्ती वाढली

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून राज्य सरकारने मंगळवारी आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांची संख्या आता ३०४ वरून ३०८ वर पोहचली आहे. याशिवाय आणखी ९ तालुक्यांचे ग्राऊंड सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

महसूलमंत्री तथा दुष्काळी उपाययोजनांच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत पाणीटंचाई निवारण, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे आणि शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. दुुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून आवश्यक उपाययोजनांना गती देण्यासाठी पालक सचिवांनी अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन दुष्काळाच्या सर्व निकषांनुसार परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मुख्य सचिवांकडे सादर करावा, असे निर्देश बावनकुळे यांनी बैठकीत दिले.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या दहा उपाययोजनांबाबत येत्या एक-दोन दिवसांत शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत योजना पूर्ण झाल्यास ज्या गावांमध्ये टँकरची आवश्यकता भासणार नाही अशा १३ तालुक्यांतील २१२ योजनांच्या कामांसाठी वित्त विभागाने ८३.१८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच रेट्रोफिटिंगसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या कामांसाठी यापूर्वीची ३४९ कोटी रुपयांची थकबाकी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध होणार असून हा निधी डिसेंबरअखेरपर्यंत मिळेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मृद आणि जलसंधारण विभागाचा यापूर्वी मंजूर करण्यात आलेला पाच हजार कोटी रुपयांचा नियोजन आराखडा रद्द करून नव्याने आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या नवीन आराखड्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह भीषण दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांना प्राधान्य देण्यात यावे. यासाठी पुढील एक-दोन महिन्यांत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करावी असे निर्देश बावनकुळे यांनी यावेळी दिले. दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांचा समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांची समिती स्थापन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते.

चिपळूण, दिंडोरी, वाडा, विक्रमगडचा समावेश
– चिपळूण , दिंडोरी, वाडा आणि विक्रमगडचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश
– कागलसह करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज आदी तालुक्यांचे ग्राऊंड सर्वेक्षण करण्याचे आदेश
– शिरपूर पॅटर्नप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्याची सूचना

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News| माहूरच्या दत्त मांजरीत २०० हून अधिक गांजाची झाडे जप्त;एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल
01:50
Video thumbnail
Nanded News | माहूरमध्ये ८३ किलो गांजा जप्त; ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ११८ झाडे उद्ध्वस्त
02:27
Video thumbnail
Latur News |आमदार अमित देशमुखांच्या हस्ते किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे उद्घाटन
09:08
Video thumbnail
Latur News | पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाची कारवाई; २५ जणांना दंड, २६७ जणांना नोटिसा
02:05
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42

Latest news