28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeसोलापूरपवित्र रमजानविषयी इखलास पुस्तकाचे प्रकाशन

पवित्र रमजानविषयी इखलास पुस्तकाचे प्रकाशन

सोलापूर : येथील अनिसा शेख व खाजा बागबान संपादित व ग्रामीण मुस्लीम मराठी साहित्य संस्था प्रकाशित पवित्र रमजानविषयी माहितीवर आधारित पुस्तक इखलासचे प्रकाशन करण्यात आले.
सोशल महाविद्यालयात अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. इ. जा. तांबोळी, सचिव अय्यूब नल्लामंदू, मजहर अल्लोळी, अयाज जुनैदी, ग्रामीण संस्थेच्या उपाध्यक्ष खाजाभाई शेख, डॉ. सुरैय्या जहागीरदार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्राचार्या अनिसा शेख, परवीन फराश, इंतेखाब फराश,महेमुदा शेख, अ‍ॅड. उमाकांत आदमाने, रशीद तहशीलदार, बा. ह. मगदूम, अ‍ॅड. हाषम पटेल, रजिया जमादार, निलोफर फणीबंद, तहसीन सय्यद, नसीमा जमादार, दिलशाद सय्यद आदी उपस्थित होते.

‘इखलास’ या पुस्तकाला अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मरहूम अब्दुल लतीफ नल्लामंदू, स्व. अ‍ॅड. सिकंदर शेख, नागपूरचे स्व. डॉ. अक्रम पठाण, स्व. सत्तार पठाण या ज्येष्ठ दिवंगत साहित्यिकांना अर्पण करण्यात आले आहे. प्रास्ताविकेत अय्यूब नल्लामंदू यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन खाजाभाई बागबान यांनी केले, तर आभार डॉ. सुरय्या जहागीरदार यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR