30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीयमोदींसाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर; काँग्रेसची तक्रार

मोदींसाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर; काँग्रेसची तक्रार

चेन्नई : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अलीकडेच लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली. आता या आचारसंहितेदरम्यान निवडणूक प्रचारासाठी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याप्रकरणी तामिळनाडू काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

तामिळनाडू काँग्रेसचे प्रवक्ते पीव्ही सेंथिल म्हणाले की, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना १९७५ मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने प्रचारासाठी वायुसेनेचे हेलिकॉप्टर वापरल्याबद्दल अपात्र ठरवले होते. आदर्श आचारसंहितेनुसार कोणत्याही व्यक्तीला प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करता येत नाही. हा नियम पंतप्रधान मोदींनाही लागू आहे. भाजप या हेलिकॉप्टरसाठी भाडे देत आहे का, हे स्पष्ट करण्याची विनंती आयोगाला केली. तसे असल्यास इतर पक्षाच्या नेत्यांना देखील याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तृणमूल खासदाराची तक्रार
दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी देखील पंतप्रधान मोदींवर आंध्र प्रदेशमधील निवडणूक रॅलीत भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरुन निवडणूक संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. गोखलेंच्या तक्रारीनुसार, पीएम मोदींनी १७ मार्च रोजी आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील चिलाकलरुपेत झालेल्या सभेसाठी हवाई दलाच्या एमआय १७ हेलिकॉप्टरचा वापर केला होता. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR