30.2 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeपरभणीभगवदगीता प्रज्ञाशोध परीक्षेत मोहिनी आवचार प्रथम

भगवदगीता प्रज्ञाशोध परीक्षेत मोहिनी आवचार प्रथम

परभणी : इस्कॉनच्या कार्याची माहिती तसेच भगवदगीतेचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या हेतूने भगवदगीता प्रज्ञाशोध परीक्षा श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये आयोजित केली होती. या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सदरील परीक्षेत प्रथम मोहिनी किशन आवचार, द्वितीय विशाल पंडितराव माने, तृतीय दिपक फुलझाडे यांनी क्रमांक पटकावला. त्यांना रोख ३ हजार, २ हजार, १ हजार व प्रोत्साहनपर सहा बक्षिसे ग्रंथ भेट देऊन विद्यार्थ्यांचा मान्यवरांनी सन्मान केला.

श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग आणि इस्कॉन शाखा परभणीच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.२० रोजी भगवदगीता प्रज्ञाशोध परीक्षा बक्षीस वितरण कार्यक्रमास डॉ.धनंजय पुरी, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, समन्वयक डॉ.प्रल्हाद भोपे, माधव घोडके, सचिन राऊत उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पुरी म्हणाले की, मानवाला मिळालेला जन्म अनमोल आहे. जीवन हीच परीक्षा आहे. संत-महापुरुषांनी आयुष्यभर पवित्र कर्म केले. भगवदगीता जीवनाचा अविभाज्य भाग बनवा अशा प्रकारचे आवाहन डॉ. पुरी यांनी केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ.श्रीनिवास केशट्टी यांनी केला. प्रास्ताविक सचिन राऊत, सूत्रसंचालन सिद्धेश्वर थावरे यांनी तर आभार डॉ. प्रल्हाद भोपे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सिद्धेश्वर थावरे, अनिकेत नीलवर्ण, धनंजय सिताफ, मराठी विभागातील शारदा बेंडे, कावेरी बेंडे, दीपक फुलझळके, साहेबराव येलेवाड यांनी प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR