निनावी पत्राने उडाली खळबळ
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असायचे. त्यातच आता कोश्यारी यांनी अनंत अंबानी यांच्याकडून देणग्या घेतल्या असल्याचे एक निनावी पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळाले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेला किती देणग्या मिळाल्या, याची माहिती मागवली होती. मात्र ही माहिती राजभवनकडे नसल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. मात्र, दुस-या बाजूला माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना एक निनावी पत्र मिळाले. या पत्रात अनंत अंबानी यांनी भगतंिसंह कोश्यारी यांच्या संस्थेला १५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती आहे. कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंड मधील एका शाळेच्या नावाने भरपूर माया गोळा केली आहे. १०० सुद्धा मुले नाहीत, अशा शाळेकरिता कोट्यवधींच्या देणग्या गोळा केल्या आहेत. त्या पैशातून आपला पुतण्या दिपेंदरसिंह कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसोर्ट सुरू केले आहे. अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी १५ कोटी रुपये घेतले आहेत. शेरसिंग कार्की सरस्वती विहार, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी यांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळ््या केल्याची माहिती आहे.