33.9 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडनांदेड मनपा उपायुक्त खानसोळेंची लातूर मनपा उपायुक्तपदी बदली

नांदेड मनपा उपायुक्त खानसोळेंची लातूर मनपा उपायुक्तपदी बदली

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील पशुधन विकास अधिकारी उपायुक्त पंजाब खानसोळे यांची लातुर येथील महानगरपालिकेमध्ये उपायुक्त या पदावर (प्रतिनियुक्ती) बदली करण्यात आली.

२६ मार्च रोजी शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये पशु व संवर्धन विकास अधिकारी या पदावर कार्यरत असलेले पंजाबराव खानसोळे यांची लातुर येथील महानगर पालिकेत उपायुक्त या पदावर बदली करण्यात आली. सदर बदली प्रशासकीय रिक्त पदावर करण्यात आली असून तात्काळ त्यांना रुजू होण्याचे आदेश शासनाने काढलेल्या आदेशात देण्यात आले आहेत. खानसोळे यांनी नांदेड महापालिकेत अनेक महत्वांची कामे केली आहेत. त्यांना महापालिकेत अनेक महत्वांच्या पदाची जवाबदारी देण्यात आली होती. अचानक झालेल्या बद्दलीमुळे खानसोळे यांना तात्काळ लातूर येथे जावे लागणार आहे.

यासोबतच नगरचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची अहमदनगर महापालिका उपायुक्तपदी, राज्य कर सहायक आयुक्त श्रीकांत पवार यांची नगर महापालिका उपायुक्तपदी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांची सांगली महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांची नवी मुंबई मनपा उपायुक्तपदी, सहायक निबंधक स्मृती पाटील यांची इचलकरंजी मनपा उपायुक्तपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR