34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीय१०० खासदारांना उमेदवारी नाकारली

१०० खासदारांना उमेदवारी नाकारली

भाजपचे धक्कातंत्र, ४०० पारचा प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या ५ याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने देशातील सुमारे ९० टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली. यात भाजपने १०० विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ९० टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे ४०० पारचे लक्ष्य आहे. यासाठी भाजपने योजना आखली आहे. या योजनेसाठी भाजपने १०० खासदारांना झटका दिला आहे. भाजपने आगामी लोकसभेसाठी १०० विद्यमान खासदारांचे तिकीट कापले. १०० विद्यमान खासदारांवर निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने भाजपने खासदारांना दुसरी संधी दिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या १०० खासदारांना मोठा दणका बसला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत ४०२ उमेदवारांना खासदारकीचे तिकीट दिले आहे. आगामी निवडणुकीत भाजप ४४० ते ४५० जागांवर उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने १०० जागांवरील विद्यमान खासदारांना दुस-यांदा संधी दिलेली नाही. यावरुन ४०० पार जागांसाठी भाजपचे नियोजन चोख झालेले असल्याचा अंदाज येऊ शकतो.

४०० पारसाठी भाजपचा प्लॅन
भाजपने मित्रपक्ष वगळता स्वत:च्या बळावर ३७० जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर मित्रपक्षांसोबत ४०० हून अधिक जागांवर विजय मिळवण्याची भाजपला अपेक्षा आहे. यामुळे भाजपने सध्याच्या १०० खासदारांना दुसरी संधी ने देता त्यांचे तिकीट कापले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR