34.1 C
Latur
Saturday, May 11, 2024
HomeFeaturedश्याओमीने लाँच केली ७०० कि.मी. रेंजची इलेक्ट्रिक कार

श्याओमीने लाँच केली ७०० कि.मी. रेंजची इलेक्ट्रिक कार

मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये श्याओमीने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार सादर केली होती. ‘श्याओमी एसयू 7’ असे नाव असलेल्या या कारने संपूर्ण कार्यक्रमावर आपली छाप सोडली होती. ही कार कधी लाँच होते आणि तिची किंमत किती असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. अखेर कंपनीने चीनमध्ये ही कार लाँच केली आहे.

श्याओमीच्या या कारचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील पहिल्या व्हेरियंटमध्ये ७३.६ किलोवॅट बॅटरी देण्यात आली आहे. या व्हेरियंटची रेंज सुमारे ७०० किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत २,१५,९०० चिनी युआन (सुमारे २५ लाख रुपये) एवढी आहे.

या कारचे दुसरे व्हेरियंट ‘श्याओमी एसयू 7 प्रो’ तब्बल ८३० किलोमीटरची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये ९४.३ किलोवॅट बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत २,४५,९०० युआन (सुमारे २८.५ लाख रुपये) एवढी आहे. तर याच्या टॉप मॉडेल ‘श्याओमी एसयू 7 मॅक्स’मध्ये १०१ किलोवॅट बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज तब्बल ९०० किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत २,९९,९०० युआन (सुमारे ३५ लाख रुपये) एवढी आहे.

टेस्लाला देणार टक्कर
कंपनीने जाहीर केलेल्या किंमती या चीनमधील आहेत. कंपनीने अद्याप भारतातील लाँच डेट किंवा भारतातील किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच टेस्लाला भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. टेस्लाने देखील भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची योजना आखली आहे. यातच श्याओमीला देखील भारतात कार लाँच करण्याची परवानगी मिळाली, तर दोन्ही कंपन्यांमध्ये चांगलीच टक्कर पहायला मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR