41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रभोसा घाटावर वाळू माफियाचा तुफान गोळीबार; २ जखमी

भोसा घाटावर वाळू माफियाचा तुफान गोळीबार; २ जखमी

- भोसा- साकुर वाहतुकीच्या रस्त्यावरून वाद - ४ जणांना अटक

श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
महागाव तालुक्यातील नदीपात्रा ला लागून असलेल्या भोसा आणि साकुर वाळू घाटावरून वाळू भरून जाणा-या वाहनांना एकच रस्ता असल्याने वाहनांना एकमेकांनी अडविल्याने झालेल्या वादातून एकमेकावर बंदुकीच्या २५ते ३० फैरी झाडल्याची खळबळजनक घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास भोसा वाळूघाटावर घडली असून या प्रकरणी महागाव पोलिसांत २५ जणांवर गुन्हा दाखल होवून ४ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पैनगंगा नदीक्षेत्रात वाळू माफियांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून वाळू घाट हाराशी विदर्भातली आणि वाळू चोरी मात्र माहूर तालुक्यातील लांजी आणि नेर शिवारात ‘फुकट के माल पर दीदे लाल’ करत असूनही काल दि. २८ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास महागाव तालुक्यातील भोसा घाटावर रेतीमाफियांच्या दोन गटात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली असून या गोळीबारात तब्बल २५ राऊंड फायर झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदरमाफियांमधील गोळीबाराची थरारक घटना ही रस्त्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती पुढे आली असून महागाव व आर्णी तालुक्याच्या सिमेवरील साकूर व भोसा या दोन वाळू घाटांवर गुरूवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेत ४ ते ५ टिप्पर, स्विफ्ट डिझायर आणि इतरही दोन वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचेही सांगितले जात असून महागाव तालुक्यातील दोन घाटांमधील रस्त्यावरून माफियांमध्ये वाद होवून यात वाळू माफियांच्या दोन गटांकडून फायरींगबरोबरच हाणामारी, दगडफेकीची घटना झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.. घटनेची माहिती मिळताच काल रात्री उशिरा पोलीस विभागातील मोठे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरून २ जिवंत काडतुसे व चार रिकामी काडतुसे प्राप्त झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.. याप्रकरणी महागाव पोलीसांत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी चौघांना अटक केली आहे.

त्या व्हिडीओ क्लिप मधील प्रसंग प्रत्यक्षात अवतरल्यास किंबहूना जर तर चा प्रसंग निर्माण झाल्यास माहूर तालुक्यातील सायफळ येथेही रस्त्याच्या वाद कोणत्याही थराला जाणार यात तिळमात्रही संका नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने वेळीच सावध होवून रेतीचोरांच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा वाळू तस्करीच्या नादात एखाद्या शेतक-याचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महागावचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे आधी माहूरला असल्याने त्यांना माहूर तालुक्यातील वाळू तस्कर यांची संपूर्ण माहिती असल्याने त्यांनी नेर आणि लांजी त्या दोन घाटावर एका जुन्या वाळू तस्करास संधी दिल्याने तसेच सायफळ वडसा पडसा लिंबायत येथील जप्तीची हाराशीही माहूरच्या तहसीलदारांना सांगून एका मोठ्या नेत्याच्या चेल्यांना मिळून दिल्याने त्यांनी उच्छाद मांडला असून रात्री झालेल्या गोळीबारात माहूरचे हे तथाकथित डॉन उपस्थित असल्याने त्यांचेवाहनांची तोडफोड झाली .

त्यांच्या मागे विदभार्तील गुंड बंदुकी घेऊन लागल्याने काट्याकुपाट्यातून पळून त्यांनी आपला जीव वाचविण्याची चर्चा रंगली असून एखाद्याचा जीव जाण्याआधी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गोपनीय पथक पाठवून किमान चौकशी तरी करावी अशी मागणी नागरिकतन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR