36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रविशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदारांच्या गाडीवर दगडफेक

विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदारांच्या गाडीवर दगडफेक

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच प्रचारात काही ठिकाणी तणाव निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. सांगली लोकसभेत प्रचारासाठी जात असताना एका माजी आमदारांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौ-या दरम्यान जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर दोन ते तीन जणांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR