39.5 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeसोलापूरसोलापुरातील २२ तर साता-यातील १० उमेदवार मैदानात

सोलापुरातील २२ तर साता-यातील १० उमेदवार मैदानात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा व सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मिळून अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभेसाठी यंदा कमालीची चुरस आहे. यंदाच्या निवडणुकीत ३२ उमेदवार मैदानात आहेत. त्यातील २२ उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील तर १० उमेदवार सातारा जिल्ह्यातील आहेत.
एकट्या माळशिरस तालुक्यातून तब्बल आठ उमेदवार खासदारकीच्या मैदानात उतरले आहेत.

माढ्याच्या मैदानात ३२ उमेदवार असले तरीही खरी लढत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात आहे.
निंबाळकर फलटण तालुक्यातील असून त्यांच्या तालुक्यातून चार उमेदवार आहेत. मोहिते-पाटील माळशिरसमधून असून त्यांच्या तालुक्यातून आठ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रमुख उमेदवारांच्या तालुक्यातून मैदानात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांचा कोणाला फटका व कोणाला फायदा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून धनगर समाजाचे दहा उमेदवार नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये बसपचे स्वरूप जानकर, सिद्धेश्वर आवारे, रामचंद्र घुटुकडे, संतोष बिचुकले, अशोक वाघमोडे, काशिनाथ देवकाते, धनाजी मस्के, नवनाथ मदने, सचिन जोरे, लक्ष्मण हाके या उमेदवारांचा समावेश आहे. माढा लोकसभा मतदारसंघात मराठा समाजानंतर धनगर समाजाचे दुस-या क्रमांकाचे मतदान आहे. माढ्यातील खासदारकीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचे यातून दिसत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार
धैर्यशील मोहिते-पाटील, सिद्धेश्वर आवारे, गोपाळ जाधव, रमेश बारसकर, रामचंद्र घुटुकडे, अशोक वाघमोडे, काशिनाथ देवकाते, किरण साठे, गिरीश शेटे, सचिन जोरे, धनाजी मस्के, नवनाथ मदने, बळिराम मोरे, भाऊसाहेब लिगाडे, रोहित मोरे, रशीद शेख, गणेश सरडे, राहुल सावंत, विनोद सीतापुरे, सीताराम रणदिवे, हनुमंत माने, लक्ष्मण हाके.

सातारा जिल्ह्यातील उमेदवार
रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वरूप जानकर, नंदू मोरे, नारायण काळेल, नानासाहेब यादव, संदीप खरात, अमोल करडे, अनिल शेडगे, सत्यवान ओंबासे, संतोष बिचुकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR