19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र या

भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र या

प्रकाश आंबेडकरांचे मतदारांना आवाहन; नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर

सांगली : आगामी निवडणुकीत मतदरांनी बॅलेट पेपरची मागणी केली पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते सांगलीच्या मिरजमध्ये बोलत होते. तसंच नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर आहेत. त्यांना ओळखले पाहिजे, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हे आपल्या हातात आहे असं मतही त्यांनी नोंदवले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘ईव्हीएम’बाबत चौकशी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. खरोखरच त्या मशिनमध्ये बिघाड आहे. ४३१ उमेदवार असतील तर बॅलेटवर मतदान घ्यावे लागते. त्यामुळे ४३१ उमेदवार उभे केले पाहिजे. या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरची लोकांनी मागणी केली पाहिजे. तसेच नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर आहेत. त्यांना ओळखले पाहिजे, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हे आपल्या हातात आहे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत बोलताना व्यक्त केले. आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाशी चर्चा करून त्यांची मतेही जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी येथील मीरासाहेब दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आंबेडकर बोलत होते.

राज्यात जातीय तेढ निर्माण केले जात आहे
भाजप सरकारकडून भीती दाखविली जाते. निवडणूक आली की हिंदू-मुस्लिम दंगल होईल की काय हे सांगता येत नाही. ओबीसी विरुद्ध मराठा भांडण सुरू झाले आहे. धनगर विरुद्ध आदिवासी भांडण यांनी लावले आहे, असे ते म्हणाले. ईव्हीएम मशीनवर निवडणुका न करता बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका होण्यासाठी त्यांनी विविध पर्याय सांगितले, जनतेतून जागृती करून बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी झाली तर शासनाला पर्याय उरणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR