38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून भेसळयुक्त खवा जप्त

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून भेसळयुक्त खवा जप्त

मुंबई : पालघर – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून राजस्थान आणि गुजरात मधून मुंबई , पुणे , ठाणे या महानगरांमध्ये विक्रीस आणला जाणारा तब्बल ४५ लाख रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

तलासरीतील दापचरी सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळयुक्त खवा ताब्यात घेतला. तब्बल २२ हजार ८७९ किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात यश आलं आहे. या पैकी ३ हजार किलो खवा अहवाल आल्याने नष्ट करण्यात आला.

दिवाळीनिमित्त सध्या मोठ्या प्रमाणावर मुंबई ठाणे पुणे या शहरांमध्ये गुजरात आणि राजस्थान मधून भेसळयुक्त खवा आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १२ डिलर्सकडे हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती एफडीला मिळाली होती.

भेसळयुक्त खव्याची ओळख
– खव्याचा एक छोटा तुकडा घेऊन अंगठा आणि बोटामध्ये थोडा वेळ दाबा किंवा रगडा. असे केल्यानंतर जर त्यात असलेल्या तुपाचा वास अंगठ्यावर बराच काळ राहिला तर तो खवा शुद्ध समजावा. नाहीतर तो खवा भेसळयुक्त आहे.
– खव्याचा छोटा तुकडा हातावर घ्या आणि त्याचा हाताच्या तळहातावर गोळा तयार करा. तुम्ही ते तळहातांमध्ये बराच वेळ फिरवत राहा. त्यानंतर मऊ गोळा तयार झाला तर तो खावा शुद्ध आहे आणि जर तो गोळा फुटायला लागला तर समजून घ्या की तो खवा भेसळयुक्त आहे.

– थोडे पाणी गरम करून त्यात ५ ग्रॅम खवा घाला. ते थंड झाल्यावर त्यात आयोडीनचे द्रावण टाका. यानंतर खव्याचा रंग निळा पडू लागला तर समजून घ्या की तो खवा भेसळयुक्त आहे.

– शुद्ध आणि भेसळयुक्त खाव्यात फरक ओळखण्यासाठी तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. खवा तोंडात टाका. तोंडात टाकल्यानंतर जर खवा तोंडाला चिकटत असेल तर तो भेसळयुक्त खवा आहे. कारण ख-या खव्याची चव कच्च्या दुधासारखी असते आणि तो चिकटत नाही.

– खव्याची शुद्धता ओळखण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. खव्याचा थोडा तुकडा पाण्यात टाकून फेटा. यानंतर त्याचे छोटे तुकडे झाले तर तो खवा भेसळयुक्त आहे आणि असा खवा खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR