34.7 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनदिग्दर्शक वासन बाला यांनी दिल्या आलियाला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

दिग्दर्शक वासन बाला यांनी दिल्या आलियाला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आज तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणा-या आलियाने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आलियाने आतापर्यंत अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या वर्षी रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेच्या यशानंतर आलिया भट्ट दिग्दर्शक वासन बालाच्या ‘जिगरा’ या चित्रपटात दिसणार आहे. आलियाच्या वाढदिवसानिमित्त ‘जिगरा’च्या दिग्दर्शकाने आलियाला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिग्दर्शक वासन बालाने त्याच्या आगामी जिगरा चित्रपटातील आलियाचा खास फोटो शेअर केला असून हॅपी बर्थडे सुपरस्टार असे लिहिले आहे. दिग्दर्शक वासन बालाच्या या पोस्टवर जिगरामधील आलियाचा को-स्टार वेदांग रैनानेही प्रतिक्रिया दिली आणि हार्ट इमोजीसह कमेंट केली तर आलियाच्या चाहत्यांनीही या पास्टवर कमेंन्ट्स करून आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय आहे की, आलिया भट्टने गेल्या दोन वर्षांत अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. २०२२ मध्ये, ती गंगूबाई काठियावाडी, आरआरआर, डार्लिंग्स और ब्रह्मास्त्र सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील अभिनयासाठी आलियाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.

आलियाचे उत्कृष्ठ १० चित्रपट
आलियाने आपल्या करियरमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटात काम केले असून त्यापैकी हाईवे, २ स्टेट्स, उडता पंजाब, डियर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी, गली बॉय, गंगूबाई काठियावाडी, रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटामुळे ती खूप चर्चेत आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR