33.7 C
Latur
Saturday, May 11, 2024
HomeFeaturedअजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेतली. बारामतीच्या जागेवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महादेव जानकर बारामतीत लढवणार ही अफवा आहे. शिरुर, बारामती, धाराशीव, परभणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच अजित पवार यांनी आज पहिला उमेदवार जाहीर केला.

रायगडमधून सुनील तटकरे यांची उमेदवारी अजित पवार यांनी घोषित केली. महायुतीत जागावाटपाचे ९९ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. संध्याकाळी आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश आहे. त्यानंतर बाकी उमेदवार जाहीर होतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

महायुतीत कोणतेही गैरसमज नाहीत. महायुतीच्या ४८ जागांमध्ये महाराष्ट्रात कोणी किती जागा लढवाव्या ९९ टक्के काम झाले आहे. बारामती बाबत थोडा सस्पेंस ठेवू द्या. २८ तारखेला नाव जाहीर करतो. पण तमुच्या मनात जे नाव आहे ते जाहीर करणार, असे अजित पवार म्हणाले.

गेल्या निवडणुकीत भाजपला २३ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या. ४ राष्ट्रवादी काँग्रेस, १ नवनीत राणा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. एमआयएमची एक जागा होती. राष्ट्रवादीला फक्त ३ जागा मिळतात, कारण नसताना अशी चर्चा पसरवली गेली. मात्र कार्यकर्त्यांचे समाधान होईल तेवढ्या जागा मिळाल्या आहेत. एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते जाहीर करु. बारामतीत तुमच्या मनात ज्यांचे नाव आहे, त्यांचे नाव जाहीर होणार आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR