38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeअंतरराष्ट्रीयरमजानचा पवित्र महिन्यात गाझामध्ये युद्धविराम?

रमजानचा पवित्र महिन्यात गाझामध्ये युद्धविराम?

तात्काळ युद्धबंदीची मागणी यूएनएससीमध्ये ठराव मंजूर

उत्तर गाझा : गाझामध्ये युद्धविराम करण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. परंतु अमेरिकेने या प्रस्तावावर मतदान केले नाही. पण प्रस्तावाच्या बाजुने १४ मते पडली आहेत. हा प्रस्ताव निश्चित लागू झाला पाहिजे असे युएनएससीचे सरचिटणीस एंटीनिया गुटरेस म्हणालेत.

इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. या महायुद्धाचा सर्वात वाईट परिणाम गाझा शहरावर झाला आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. गाझामध्ये राहणा-या सामान्य नागरिकांना अन्न, झोप आणि उपचारांची गरज आहे. तर ३८ हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देश आणि संघटना इस्राइलकडे युद्धविरामाची मागणी करत आहेत, मात्र इस्राइल आणि हमास आपल्या अटींवर ठाम आहेत. दरम्यान, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल ने मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. इस्राइल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे पाच महिन्यांत प्रथमच परिषदेने असे करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, या ठरावावरील मतदानावेळी अमेरिका अनुपस्थित राहिली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत १५ पैकी १४ सदस्यांनी गाझामधील युद्धबंदीच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचा ठराव १० कौन्सिल सदस्यांनी संयुक्तपणे मांडला होता. या बैठकीत मतदानादरम्यान अमेरिका अनुपस्थित राहिली.

काय आहेत प्रस्तावाच्या अटी?
– ठरावामध्ये १० मार्चपासून सुरू झालेल्या “रमजान महिन्यासाठी तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करण्यात आली. ठरावात सर्व ओलीसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
– संयुक्त राष्ट्र संघात सोमवारी संमत झालेल्या या ठरावामुळे पहिल्यांदाच सुरक्षा परिषदेने उघडपणे युद्धबंदीचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने इस्राइलवर दहशतवादी हल्ला केला तेव्हा इस्रायइने हमास या दहशतवादी संघटनेवर पूर्ण ताकदीने हल्ले करण्यास सुरुवात केली. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या प्रत्येक हल्लेखोराचा खात्मा होईपर्यंत युद्ध सुरूच ठेवण्याची शपथ घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR