ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट? ‘ऑपरेशन टायगर’मुळे ६ खासदार शिंदे सेनेच्या वाटेवर; आज लोकसभा सभापतींची घेणार भेट!

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा रंगली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे सर्व खासदार आज बुधवारी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला ९ पैकी फक्त ४ खासदार उपस्थित राहिल्याने या चर्चांना उधाण आले असून ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी पडझड होण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता नांदेड विमानतळावरून एक चार्टर्ड विमान दिल्लीकडे रवाना झाले. या विमानामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह आणखी एक खासदार उपस्थित होते. यासोबतच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेही दिल्लीत दाखल झाले असून हे सर्व खासदार सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. हे खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय संजय दिना पाटील मुंबईत आणि ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याची माहिती आहे.

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही वेगवान हालचाली पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात ‘नंदनवन’ या निवासस्थानी रात्री उशिरा एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे रात्रीच दिल्लीसाठी रवाना झाल्याचे समजते. दुसरीकडे, शिंदे सेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत आधीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याने ‘ऑपरेशन टायगर’ला कमालीचा वेग आल्याचे स्पष्ट होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रात या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली. १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला ९ पैकी ५ खासदारांनी दांडी मारली होती. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मतदारसंघात धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्याचे कारण देत अनुपस्थिती दर्शवली होती. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, संजय जाधव हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रात मंत्रिपद आणि मतदारसंघासाठी मोठ्या निधीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघातही मोठा विकासनिधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते.

एकीकडे खासदार फुटण्याच्या चर्चांना उधाण आले असताना, ठाकरे गटानेही आपल्या बाजूने हालचाली तीव्र केल्या आहेत. ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी संभाव्य फूट रोखण्यासाठी आणि तांत्रिक बाजू मजबूत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील खासदारांचा गट अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार का, आणि यावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news