34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावतीत मैदानावरून बच्चू कडू- नवनीत राणा आमने-सामने

अमरावतीत मैदानावरून बच्चू कडू- नवनीत राणा आमने-सामने

अमित शहा यांची उद्या सभा; तर प्रहारचा पण दावा

अमरावती : अमरावती हा सध्या राज्यातील सर्वांत हायहोल्टेज मतदारसंघ ठरला आहे. नवनीत राणा यांना भाजपने तिकिट दिल्यापासून राजकीय सारिपाटावरील गणितं बदलली आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने उमेदवार उभा केला आहे.

काँग्रेसने शड्डू ठोकले आहेत तर आनंदराज आंबेडकर हे पण नशीब आजमावत आहेत. या सर्व राजकीय धुरळ्यात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सायन्सकोर मैदानावरून नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी अमरावतीमधील मुख्य भागातील सायन्सकोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. २३ आणि २४ एप्रिलसाठी प्रहारने हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरून पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे. पण त्याच ठिकाणी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीची जय्यत तयारी पण सुरू करण्यात आल्याने प्रहार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दबावतंत्राचा बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.

उद्या अमित शहा यांची सभा
अमरावती येथील सायन्सकोर मैदानावरून नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत. अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. उद्या याच मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि बच्चू कडू यांची सभा होणार असल्याचे समजते. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजपकडून मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यास उद्याच्या सभेवर संकट उभे ठाकणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR