34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसांगलीत तिहेरी लढत

सांगलीत तिहेरी लढत

सांगली : महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेसचे विशाल पाटीलही ठाम राहिले आहेत. त्यामुळे सांगलीत आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे संजय काका पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी लढत होणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड केले आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असतानाही ते लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. यामुळे विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गटासमोर मोठे आव्हानच उभे केले आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेसचे विशाल पाटीलही ठाम राहिले आहेत.

त्यामुळे सांगलीत आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे संजय काका पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसेचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी लढत होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विशाल पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले, मात्र विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. त्यामुळे विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने ठाकरेंचे टेन्शन चांगलेच वाढल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR