34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० जणांचा मृत्यू

मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : मलेशियामध्ये लष्कराच्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेत टक्कर झाल्याची घटना घडली आहे. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लष्करी तालीम सुरू होती. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व वैमानिक दलाचे सदस्य होते. सध्या या मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

मंगळवारी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी मलेशियाच्या पश्चिम भागात असणारया पेराक येथील लुमूट या नौदलाच्या तळावर लष्करी तालीम होत्या. मलेशियन नौदलाच्या ९०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी हेलिकॉप्टर्सच्या तुकडीकडून सराव सुरू होता. त्यावेळी ऌडट हेलिकॉप्टर फेनेक हेलिकॉप्टरच्या रोटरला जाऊन धडकले.
ही टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर्सच्या पंख्याचा भाग तुटला आणि दोन्ही हेलिकॉप्टर्स जमिनीवर कोसळले. या धडकेनंतर फेनेक हेलिकॉप्टर जवळच्या स्वीमिंग पूलमध्ये जाऊन कोसळले. तर ऌडट हे दुसरे हेलिकॉप्टर नौदलाच्या तळाजवळ असलेल्या मैदानात क्रॅश झाले.

या अपघातात हेलिकॉप्टर्समध्ये बसलेल्या १०जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी लुमुट येथील लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मलेशियन नौदलाकडून देण्यात आली आहे. परंतु हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मलेशियन नौदलाकडून या दुर्घटनेची सध्या चौकशी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR