28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवतुळजापूर येथे वीज कंपनीची केंद्रीय कार्यकारिणी बैठक

तुळजापूर येथे वीज कंपनीची केंद्रीय कार्यकारिणी बैठक

धाराशिव : महाराष्ट्रातील क्षेत्रातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीनही कंपन्यातील अभियंत्याची संघटना सब ऑडीर्नेट इंजिनियर्स असोसिएशन यांची सातवी केंद्रीय कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि.२५) तुळजापूर येथे आयोजित केलेले आहे. या बैठकीसाठी संघटनेचे शिखर पदाधिकारी संघटनेचे अध्यक्ष केदार रेळेकर, उपाध्यक्ष राजाराम शितोळे, संघटनेचे सरचिटणीस संतोष खुमकर, संघटनेचे संघटन सचिव नागनाथ गयाळे व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीमध्ये वीजक्षेत्रामध्ये होऊ घातलेल्या खाजगी करणाबद्दल व तिन्ही कंपनीतील अभियंत्यांच्या प्रश्नाबद्दल सविस्तर चर्चा व विचार मंथन होणार आहे. या सातव्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन धाराशिव एस.ई.ए. चे सहसचिव अभि. वैभव मगर व पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR