नसरापूर प्रकरणातील नराधमावर २८ दिवसांत आरोप निश्चित

पुणे : पुण्यातील भोर जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. २८ दिवसांत आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आला आहे. न्यायालयाकडून आरोपीविरोधात पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. आता खटल्याची रोज सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला, मात्र पुरावे नसल्याने आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आली. पंधरा दिवसात चार्जशीट दाखल करण्यात आले होते. ते सादरही करण्यात आले होते. त्याच चार्ज शीटवर आज सुनावणी पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणातील लैंगिक चाचणी, सीसीटीव्ही फुटेज या सगळ्याची तपासणी पुन्हा एकदा करण्यात आली, त्याचबरोबर दोषारोप पत्राची माहिती देखील यावेळी कोर्टाला देण्यात आली. या आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. आता रोज या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील नसरापूर येथे १ मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका ६५ वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणा-या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवले आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगा-याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्याने तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news