केमेस्ट्रीचा प्राध्यापक रडारवर

लातूर : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातुरात सापडल्याने सीबीआयचे लक्ष फुटलेल्या पेपरची खरेदी व्यवहारावर असून, पकडलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणखी काही धागेदोरे सीबीआयच्या हाती लागले असून, सीबीआयचे पथक पुन्हा लातुरात दाखल झाले आहे. शनिवारी पथकाने पुन्हा एकदा झाडाझडती सुरू केली असून, आता हे पथक लातुरात ठाण मांडून बसले आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सीबीआयने लातूरमधील शासकीय विश्रामगृहात तात्पुरते कार्यालय सुरू केले आहे. या माध्यमातून तपासाची सर्व सूत्रे वेगाने हलविली जात असून, एक केमेस्ट्रीचा प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय सखोल तपास करीत असून, या प्रकरणी संशयित आरोप असलेले नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे पॅनेल सदस्य आणि सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, आरसीसी क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर आणि डॉ. मनोज शिरूरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने आपला मोर्चा आर्थिक व्यवहारांकडे वळवला आहे. फुटलेल्या पेपरच्या खरेदी-विक्रीमागे नेमकी कोणती मोठी आर्थिक साखळी सक्रिय होती, याचा कसून शोध घेतला जात आहे
सीबीआयच्या तपासात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी नीट परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर मिळवण्यासाठी पी. व्ही. कुलकर्णीला ५ लाख रुपये दिल्याचे सीबीआयने न्यायालयात स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आणखी किती विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून लाखो रुपयांची गोळाबेरीज करण्यात आली होती. या दृष्टीने अनेक संशयितांची झाडाझडती सुरू केली आहे.

सलग दुस-या दिवशी सुरू असलेल्या या तपासादरम्यान सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळाली असून, सीबीआयचे पथक आज लातूरमधील केमिस्ट्रीच्या एका नवीन प्राध्यापकाचा कसून शोध घेत आहे. या नवीन प्राध्यापकाचा पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये किंवा प्रश्नपत्रिका वितरणात काही सहभाग होता का, या दृष्टीने संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हा प्राध्यापक नेमका कोण आहे आणि सीबीआय त्याचा शोध का घेत आहे, याबाबत गोपनीयता बाळगली आहे.

लातुरात संशयित, मध्यस्थांची चौकशी
सीबीआयच्या ८ अधिका-यांच्या पथकाने शनिवारी लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसच्या मुख्य कार्यालयावर धाड टाकत सुमारे ३ ते ४ तास कसून चौकशी केली. तेथून महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे पडताळणीसाठी ताब्यात घेण्यात आले. आज दुस-या दिवशीही सीबीआयच्या पथकांनी लातूर शहरात वेगवेगळ््या ठिकाणी जाऊन अनेक संशयित व्यक्तींची आणि मध्यस्थांची चौकशी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49

Latest news