मुख्यमंत्री विजय यांच्या अडचणी वाढल्या

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहेत. राज्यातील तीन प्रमुख पक्ष डीएमके, एआयएडीएमके, भाजप या पक्षांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आघाडी उघडली आहे. शनिवारी, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली. त्यांनी सत्ताधारी पक्षावर आमदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोप केला. एवढेच नाही, तर त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनधिकृत लोकांना प्रवेश दिल्याचाही आरोप केला.

राज्यपालांना भेटलेल्या डीएमके नेते आर. एस. भारती यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. विजय सरकार शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असून आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला. यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही राज्यपालांना वैयक्तिकरित्या भेटलो आणि तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या घोडेबाजाराची आणि सत्तेच्या गैरवापराची माहिती दिली, असेही ते म्हणाले. जॉन आणि विष्णू रेड्डी या दोन व्यक्ती, ज्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही, त्यांच्याकडे राज्यमंर्त्यांपेक्षा जास्त अधिकार असल्याचे दिसते. ते सर्व उच्चस्तरीय बैठकांना उपस्थित राहतात आणि अधिका-यांना आदेश देतात. तामिळनाडूमध्ये अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

आम्ही यापूर्वी एक याचिका केली होती, परंतु राज्यपाल शहरात नव्हते, म्हणून आज आम्ही त्यांना भेटलो आणि हे सर्व मुद्दे त्यांच्यासमोर मांडले, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील डीएमके पक्षाने मुख्यमंत्री विजय यांच्यावर याआधीही अनेक आरोप केले आहेत. अवघ्या एका आठवड्यापूर्वी, स्टॅलिन यांच्या पक्षाने घोडेबाजाराच्या आरोपाखाली विजय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.

विजय यांच्यावर आमदार फोडल्याचा आरोप
मागील आठवड्यात एमडीएमके नेते वायको यांनी आमदार फोडीचा आरोप केला होता. मुख्यमंत्री विजय यांनी वैयक्तिकरित्या आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी डीएमकेच्या दोन आमदारांना विधानसभेचा राजीनामा देऊन आपल्या पक्षात सामील होण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. डीएमकेने या दाव्याबद्दल थेट राज्यपालांकडे तक्रार केली. आरोपानुसार मुख्यमंत्री विजय यांनी आमदारांना आश्वासन दिले होते की, जर त्यांनी आपल्या जागा सोडल्या, तर त्यांना पोटनिवडणुकीदरम्यान टीव्हीकेकडून तिकीट आणि आर्थिक मदत दिली जाईल. दरम्यान आता भाजप आणि डीएमकेनेही अशी तक्रार केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन मुख्यमंत्री विजय यांची तक्रार केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26
Video thumbnail
निलंग्यात सावकारांचा नंगा नाच! शेतकऱ्यांचे अपहरण करून मारहाण?अर्धं गाव रिकामं... नेमकं काय घडतंय?
09:40
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07

Latest news