37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeपरभणीपरभणीत सोमवारपासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

परभणीत सोमवारपासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

परभणी : यश चॅरिटेबल ट्रस्ट परभणी, बालरंगभुमी परिषद जिल्हा शाखा परभणी व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालरंगोत्सव’ बालनाट्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वनामकृवि (प्रशासकीय इमारतीच्या मागे) परभणी येथे ६ ते १० मे दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत संपन्न होणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता या शिबिराचे उद्घाटन डॉ. रामेश्वर नाईक यांच्या हस्ते होणार असून या शिबिरात महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ६ ते १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण होणार आहे.

या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील नाट्य चळवळीत योगदान देणारे व २५ वर्षांपासून परीक्षक म्हणून कार्य करणारे प्रा. देवदत्त पाठक, मिलींद केळकर, फिल्म मेकिंगसह लेखक तथा दिग्दर्शक गोपी मुंडे, अभिनयात अनेक रौप्यपदक प्राप्त किशोर पुराणिक, डॉ. अर्चना चिक्षे, अभिनेते दिग्दर्शक सुनील ढवळे, लेखक दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ मस्के, बालरंगभूमी परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तथा लेखक दिग्दर्शक र्त्यंबक वडसकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सिद्धार्थ मस्के व त्र्यंबक वडसकर यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR